esakal | दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

woman caught with paramour in compromising position villagers chopped of their nose at ayodhya

नविवाहित महिलेला नको त्या अवस्थेत प्रियकरासोबत पकडल्यानंतर नातेवाईकांनी बेदम मारहाण करत दोरीने बांधले. दोघांचे नाक कापत बेदम मारहाण केली. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अयोध्या (उत्तर प्रदेश): नविवाहित महिलेला नको त्या अवस्थेत प्रियकरासोबत पकडल्यानंतर नातेवाईकांनी बेदम मारहाण करत दोरीने बांधले. दोघांचे नाक कापत बेदम मारहाण केली. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तुझ्यावर खूप प्रेम करतोय आता तू पाहाच...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिपरा गावामध्ये ही घटना घडली आहे. गावातील 30 वर्षीय विवाहित पुरुषाचे 23 वर्षाच्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. युवतीचा विवाह झाला होता. परंतु, विवाहानंतरही दोघे एकमेकांना भेटत होते. नवविवाहितेच्या नातेवाईकांनी धडा शिकवण्याचे ठरवले. शिवाय, तिच्यावर लक्ष ठेवून होते. प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. घरामध्ये गेल्यानंतर नातेवाईकांनी घराला बाहेरून कडी लावली आणि दुसऱया दरवाजामधून प्रवेश करत दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. दोघांना दोरीने बांधले आणि बेदम मारहाण केली. यानंतर प्रियकर पळून जाऊ लागला शिवाय प्रियकराला मारहाण करू नये म्हणून महिला विनवणी करू लागली. पण, नातेवाईकांचा राग अनावर झाला होता. बेदम मारहाण केल्यानंतर दोघांचेही नाक कापण्यात आले. रक्ताबंबाळ अवस्थेत दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

नवविवाहितेला घरातूनच उचलून नेले अऩ्...

नातेवाईकांनी सांगितल की, दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विवाहीता प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलावून घेत असायची. शिवाय, घरामध्ये कोणी आल्यानंतर त्याला लपवून ठेवत होती. परंतु, यावेळी दोघेही रंगेहाथ सापडल्याने पकडले गेले. दोघांना शिक्षा देण्यात आली आहे.

नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...