Video: 30 सेंकदात बुटाने किती वेळा हाणले सांगा बरं...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 डिसेंबर 2019

महिला पोलिसाने रोड रोमिओला बुटाने हाणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर 30 सेंकदामध्ये किती वेळा बुटाने हाणले सांगा बरं?

कानपूर: महिला पोलिसाने रोड रोमिओला बुटाने हाणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर 30 सेंकदामध्ये किती वेळा बुटाने हाणले सांगा बरं?, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

मुलींच्या महाविद्यालयाजवल उभ्या असलेल्या युवतींची छेडछाड केल्यामुळे रोड रोमिओला चांगलेच धुतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसाचेही कौतुक केले जात आहे.

बिठूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कानपूरच्या बिठूर चौकात मुलींच्या महाविद्यालयाजवळ काही मुले बसतात व मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शिवाय, टवाळक्याची परिसरात दहशत आहे. पोलिसांनी कॉलेजच्या परिसारात पाळत ठेवली. यावेळी अरविंद नावाचा युवक विद्यार्थीनींच्या दिशेने पाहात अश्लील वक्तव्य करत असल्याचे दिसून आले. महिला पोलिस चंचल चौरसिया यांनी त्याला पकडले आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर धडा शिकविला. पोलिस चौकित आणल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रोड रोमिओला माराहण होत असताना उपस्थितांपैकी कोणीतरी मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करत व्हायरल केले. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर चंचल चौरसिया या चर्चेत आल्या. त्यांनी 30 सेकंदामध्ये 22 वेळा बुटाने हाणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman constable beats man for allegedly harassing school girls in kanpur