esakal | बाळाला घेऊन कर्तव्यावर हजर
sakal

बोलून बातमी शोधा

woman Constable Priti Rani

बाळाला घेऊन कर्तव्यावर हजर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नोएडा (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमाला आपल्या दीड वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावलेली एक महिला कॉन्स्टेबल चर्चेचा विषय ठरली. प्रीती राणी (वय २०) असे या कॉन्स्टेबलचे नाव असून, त्या सकाळी सहा वाजल्यापासून कर्तव्यावर हजर होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री आदित्यनाथ हे काल सकाळी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटनाला येणार असल्याने सुरक्षेसाठी पहाटेपासूनच पोलिस तैनात होते. या ठिकाणी प्रीती राणी यांनाही सुरक्षेसाठी हजर राहण्याचे आदेश होते. प्रीती राणी यांच्या पतीला काल एका परीक्षेसाठी जायचे असल्याने बाळाला सांभाळण्यासाठी घरी कोणीही नव्हते.

बाळाच्या जबाबदारीबरोबरच पोलिस म्हणून असलेले कर्तव्यही महत्त्वाचे असल्याने प्रीती राणी या बाळाला घेऊनच कर्तव्यावर हजर झाल्या. 

loading image