चक्क 72 व्या वर्षी महिला झाली बाळंत अन् दिला जुळ्यांना जन्म!

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

ई मंगायम्मा असे त्या महिलेचे नाव असून, त्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील द्रकश्रमम येथील रहिवासी आहेत. डॉ. सनक्कायला अरुणा यांनी सीझेरियन पद्धतीने बाळंतपण केले.

अमरावती (आंध्र प्रदेश) : एका 72 वर्षीय महिलेस जुळ्या मुली झाल्याची घटना गुंटूर येथील एका खासगी रुग्णालयात घडली. आता या महिलेचे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'साठी सुचवण्यात येणार आहे. जुळ्या मुली आणि बाळंतीण सध्या सुखरूप असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

2006 मध्ये एक स्पॅनिश महिला वयाच्या 66 व्या वर्षी बाळंत झाली होती. त्यानंतर आता 72 वर्षीय महिला प्रसूत झाली आहे. आयव्हीएफ या उपचार पद्धतीने महिलेचे बाळंतपण झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. ई मंगायम्मा असे त्या महिलेचे नाव असून, त्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील द्रकश्रमम येथील रहिवासी आहेत. डॉ. सनक्कायला अरुणा यांनी सीझेरियन पद्धतीने बाळंतपण केले.

22 मार्च, 1962 मध्ये मंगाय्यमा यांचा विवाह ई राजा यांच्याशी झाला. त्यांना मुलं व्हावीत, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांना मुलबाळ होत नव्हते. त्यानंतर आता तब्बल 54 वर्षांनंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांना जुळेमुले झाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman to deliver a baby at 74 setting a new world record