Online Food : ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; मंत्र्यांचे चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Biryani

Online Food : ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

कासारगोड - विषारी अन्नाचे सेवन केल्यामुळे एका २० वर्षीय तरुणीचा शनिवारी मृत्यू झाला. तरुणीने एका स्थानिक हॉटेलमधून मागवलेल्या बिर्यानीच्या सेवनाने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पेरुंबला निवासी अंजू श्रीपार्वती हिने ३१ डिसेंबर रोजी कासरगोड येथे रोमांसिया नावाच्या हॉटेलमधून ऑनलाईन बिर्याणी मागवली होती. (Online Food news in Marathi)

हेही वाचा: Narayan Rane : "उद्धव-रश्मी संजयला चपलेने मारतील"; राऊतांचं चॅलेंज राणेंनी स्विकारलं!

'मुलीच्या पालकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं. या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला तातडीने कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Sania Mirza : खेळापासून लग्नापर्यंत सानियाशी जोडले गेलेले वाद, आधी पेस-भूपती आणि आता शोएब मलिक

दरम्यान, राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जॉर्ज यांनी पठाणमथिट्टा येथे पत्रकारांना सांगितले की, या घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (एफएसएसए) विषारी अन्न सेवन केल्याचा आरोप असलेल्या हॉटेलचे परवाने रद्द केले जातील, असं त्यांनी म्हटलं.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोट्टायम मेडिकल कॉलेजमधील एका परिचारिकेचा कोझिकोडमधील एका भोजनालयातून अन्न खाल्ल्याने मृत्यू झाला होता.

टॅग्स :Kerala'food