esakal | नवव्या मजल्यावरून पडली बायको, नवऱ्याने पकडला हात पण...; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

नवव्या मजल्यावरून पडली बायको, नवऱ्याने पकडला हात पण...

नवव्या मजल्यावरून पडली बायको, नवऱ्याने पकडला हात पण...

sakal_logo
By
शरयू काकडे

गाझियाबाद येथील क्रासिंग रिपब्लिक टाऊनशीपच्या नवव्या मजल्यावरुन पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. महिला जेव्हा पडली तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला वाचविण्यासाठी तीचा हात पकडून ठेवला होता. हा सर्व प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये बालकनीतून पडलेल्या महिलेला एका व्यक्तीने पकडल्याचे दिसते आणि काही सेकंदातच ती उंचावरून खाली पडते असे दिसते आहे.

दरम्यान, याबाबत विजय नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ महावीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला आणि पुरुष विवाहती पती-पत्नी आहेत.आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार. महिला घसरली आणि बालकीतून पडली. तिच्या नवऱ्याने तिला वाचविण्यासाठी तिचा हात पकडला होता. आमच्याकडे या विरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. सदर महिलेला महावीर सिंग नॉयडामधील एका रुग्णालयात दाखल केले आहे. आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही या घटनेचा तपास करू''

loading image