तांत्रिकाचे ऐकून आजारी नवऱ्याला रोज देत होती 8 लाडू, नवऱ्याने मागितला तलाक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

उत्तर प्रदेश ः अंधश्रद्धेमुळे अनेकांच्या सुखी संसाराला बाधा झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अनेकदा अंधश्रद्धेमुळे, तांत्रिकाच्या सल्ल्यामुळे अनेकांना आयुष्यभर त्याचा पश्‍चात्ताप करण्याची वेळदेखील आली आहे. अंधश्रद्घेमुळे एखाद्या अडचणीवर उपाय सापडणे सोडाच; पण अनेक अडचणी पुढे निर्माण होतात.

मेरठमध्ये एक स्त्री अशीच अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकली. त्यामुळे तिचा दहा वर्षांचा संसार मोडण्याची वेळ आली. या स्त्रीचा पती वारंवार आजारी पडत असे. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी ती एका तांत्रिकाकडे सल्ला मागण्यासाठी गेली. मग तांत्रिकानेदेखील एक विचित्र उपाय त्या स्त्रीला सांगितला. रोज पहाटे 4 आणि रात्री 4 असे दिवसातून 8 लाडू त्याने नवऱ्याला खायला देण्यास सांगितले. 

त्या स्त्रीनेदेखील तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे नवऱ्याला रोज पहाटे 4 आणि रात्री 4 लाडू खायला देण्यास सुरुवात केली. पत्नीच्या या अघोरी उपायामुळे पती वैतागून गेला आणि त्याने तिच्यापासून सुटका करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. या जोडप्याला तीन मुलेदेखील आहेत.

पत्नीच्या अंधश्रद्धाळूपणामुळे या जोडप्याचा 10 वर्षांचा संसार धोक्‍यात आला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे कोर्टदेखील हे प्रकरण ऐकल्यानंतर संभ्रमात पडले होते. त्यांनी या जोडप्याला समुपदेशनाचा सल्लादेखील दिला. परंतु पत्नी अंधश्रद्धेत आंधळी झाली असून आपण तिच्याशी कोणताच व्यवहार करू शकत नाही, असे पतीने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman gave the sick husband daily on 8 laddus the advice of Tantrik,Divorce sought by husband