
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ४० वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या २४ वर्षीय तरुणासोबत पळून जाऊन कोर्ट मॅरेज केले. ही महिला चार मुलांची आई आहे. तिची मोठी मुलगी १८ वर्षांची आहे, दुसरा मुलगा १६ वर्षांचा आहे, तिसरा मुलगा १२ वर्षांचा आहे आणि चौथा ८ वर्षांचा आहे. महिलेने सांगितले की तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मी माझ्या पतीसोबत राहू शकत नाही, आता मी प्रियकरासोबतच राहणार आहे.