एक वर्षाच्या बाळाला घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ट्रम्प यांच्या सुरक्षेचे काम

Woman police constable carries one-year-old son on her duty in Ahmedabad
Woman police constable carries one-year-old son on her duty in Ahmedabad

अहमदाबाद : गुजरातमध्ये एक महिला पोलिस आपल्या एक वर्षाच्या बाळाला घेऊन सेवा बजावत आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबल संगीता परमेर यांच्या मुलाचे वय केवळ एक वर्ष आहे. अशा वेळीही त्या मुलाला घेऊन त्या आपली सेवा चोख बजावत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी त्या तैनात होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोनाल्‍ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौरा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा लक्षात घेता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुजरातमधील विविध भागात १०,००० पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी ट्रम्प यांच्या बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत.

अशावेळी सोशल मिडीयावर संगीता परमेर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबात एएनआय या वृत्तसंस्थेनेही वृत्त दिले आहे. यावेळी संगीता यांनी सांगितले की, ही वेळ कठीण असली तरी एक जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडायला हवी. जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असताना मुलाची तब्येत बिघडली असताना त्याला सोबत घेऊन यावे लागते. कामावर असताना त्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे संगीता यांनी सांगितले.

तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंदोबस्तासाठी गुजरात पोलिसांव्यतिरिक्त सीक्रेट सर्विसचे अधिकारी तसेच, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी)चाही विशेष बंदोबस्त राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com