बलात्कार झालाय, न्याय मिळत नाही, आत्महत्याच करते...

वृत्तसंस्था
Tuesday, 3 September 2019

22 वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता. पोलिसांकडे तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्यामुळे तिने आत्महत्या केली.

चंदीगड (हरियाणा): यमुनानगर जिल्ह्यातील 22 वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता. पोलिसांकडे तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

पीडित युवतीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार करूनही पोलिस कोणतीच कारवाई करत नव्हते. पोलिसांकडे ती पाठपुरावा करत होती. मात्र, न्याय मिळत नसल्यामुळे तीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अनेकदा न्याय मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्याबद्दल बोलत होती.

पोलिस अधीक्षक सुभाष चंद म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी युवतीवर बलात्कार झाला होता. बलात्काराची तक्रार दाखल असलेल्या नागरिकावर कारवाई करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Raped In Haryana Commits Suicide, Allegedly Over Police Inaction