Naari Shakti : स्वच्छतागृह साफ करणारी 'ती' बनली महापालिकेची उपमहापौर

CHinta Devi
CHinta Devi

गया - बिहारच्या गया महानगरपालिका निवडणुकीत बिहारने इतिहास रचला आहे. गयामध्ये 40 वर्षे स्वच्छतागृह साफ करणारी (manual scavengers) महिला गयाच्या उपमहापौरपदी विराजमान झाली आहे. चिंता देवी असं या महिलेचं नाव आहे. गयामध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दगड फोडणाऱ्या मुसहर जातीतील भगवतीया देवी या महिलेने देशातील सर्वोच्च स्थान असलेल्या लोकसभेत गयाचे प्रतिनिधित्व केले आहे. (woman scavenger for 40 years became deputy mayor of gaya)

CHinta Devi
Rahul Gandhi : माझ्या बदनामीसाठी भाजपने ५ हजार कोटी खर्च केले, पण...; राहुल यांचा सनसनाटी आरोप

चिंता देवी यांनी उपमहापौरपदावर विराजमान होऊन समाजाच्या शेवटच्या स्तरावर काम करून देखील स्त्री समाजातील सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते हे दाखवून दिले. स्वच्छता कर्मचारी असलेल्या चिंता देवी यांनी उपमहापौर होऊन मोठी कामगिरी केली आहे. चिंता देवी भाजीही विकायच्या. गया येथील जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिल्याचं दिसून आलं.

CHinta Devi
Kirit Somaiya : नवीन वर्ष अन् नवे नेते; घोटाळे बाहेर काढणार म्हणत सोमय्यांनी निवडली नावं!

उपमहापौर झाल्यानंतर चिंता देवी यांनी जनतेची सेवा करणार असल्याचं म्हटलं. माजी उपमहापौर मोहन श्रीवास्तव म्हणाले की, पालिकेतील स्वच्छतागृह साफ करणाऱ्या महिलेने उपमहापौरपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. दलितांना आधार देऊन समाज पुढे नेण्याचे काम शहरवासीयांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com