रेल्वे खात्यात काम करणाऱ्या महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो, व्हिडिओ चोरून काढले अन् मागितली दहा लाखांची खंडणी

Kavathe Mahankal Police Case : या घटनेत हा संशयित एकटाच आहे की, आणखीन कोण सहभागी आहेत, याचा पोलिसांनी मदभावीत तपास सुरू केला आहे. त्यामुळे आणखी किती जण जाळ्यात अडकणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Kavathe Mahankal Police Case
Kavathe Mahankal Police Caseesakal
Updated on
Summary

पीडित महिला कवठेमहांकाळ तालुक्यातील असून ती रेल्वे खात्यात (Railway Department) काम करते. संशयित आरोपीने घराजवळ जाऊन तिची चोरून छायाचित्रे काढली आहेत.

अथणी : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका महिलेची अंघोळीची छायाचित्रे चोरून काढून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या एकाला कवठेमहांकाळ पोलिसांनी (Kavathe Mahankal Police) मदभावी येथे अटक केली. मारुती रामचंद्र जाधव (वय ३६, रा. मदभावी-जाधववाडी, ता. अथणी) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेमुळे सीमाभागात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com