Sextortion: महिलेचा म्हाताऱ्याला व्हिडिओ कॉल अन् लावला दोन लाखाचा चूना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sextortion

Sextortion: महिलेचा म्हाताऱ्याला व्हिडिओ कॉल अन् लावला दोन लाखाचा चूना

 इंटरनेट हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. इंटनेट माणसाची मुलभूक गरज बनली आहे. इंटरनेटचा अति वापर करणे कधी कधी खुप धोकादायक ठरतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑनलाईन फसवणूक.  

सध्या ऑनलाईन फसवणूकीसाठी ैैwhatsappचा सर्यास वापर केला जातो. सध्या असाच एक प्रकार घाटकोपर परिसरात घडला. एका वयोवृद्ध व्यक्तीची एका महिलेने ऑनलाईन फसवणूक केली आहे. ( woman took off her clothes on video call and old man got a cost of Rs 2 lakh)

या महिलेने व्हिडीओ कॉल केला आणि कपडे काढण्यास सुरवात केली. त्यानंतर या कॉलचे रेकॉर्डींग बनवून त्यांना पाठवले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. यात या वयोवृद्ध व्यक्तीची 2.21 लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण उघ़डकीस आले.

 5 सप्टेंबरला एका अज्ञात नंबरवरुन वयोवृद्ध व्यक्तीला Whatsapp वर मेसेज आला की 'मी जयपूरचा आहे' त्यानंतर  त्याच नंबर वरुन त्यांना कॉल आला. कॉल उचलल्यानंतर त्यांना एक महिला कपडे काढताना दिसली आणि या महिलेने त्यांना पण असं करण्याचा आग्रह केला तेव्हा त्यांनी लगेच फोन कट केला.

 त्यानंतर काही तासानंतर त्यांना एका फेक पोलिस अधिकाऱ्याचा कॉल आला. हा पोलिस अधिकारी म्हणाला की त्याच्याजवळ एका महिलेच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग आहे. जर योग्य रोख रक्कम मिळाली नाही तर व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात येईल. त्याने बँक अकाउंट्सचे डिटेल्स शेअर केले. त्यानंतर वयोवृद्ध व्यक्तीने भीतीपोटी त्या अकाउंट वर पैसे पाठविले.

टॅग्स :onlineVideoVideo Call