
आग्रा (उत्तर प्रदेश) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ ऑगस्ट १६६६ मध्ये मोठ्या शिताफीने औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटका करून घेतली. पण, त्याच आग्र्यामध्ये पाच वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम ठप्प आहे. यासाठीच्या निधीचा प्रस्ताव पर्यटन विभागाने सरकारकडे पाठविला. उत्तर प्रदेश सरकारने तो मंजूर करावा, अशी अपेक्षा शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.