रामनवमीपासून मंदिराचे काम शक्‍य

Ram temple in Ayodhya can be started from Ramnavami
Ram temple in Ayodhya can be started from Ramnavami

नवी दिल्ली - अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरासाठी केंद्रातील मोदी सरकारने स्थापन केलेल्या ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ विश्‍वस्त मंडळाची पहिली बैठक येत्या १९ फेब्रुवारीला (शिवजयंती) दिल्लीत होणार आहे. या बैठकीनंतर भव्य मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माणकार्याला सुरुवात करण्याच्या तारखेचीही घोषणा होण्याची दाट शक्‍यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, रामनवमी (२ एप्रिल) किंवा अक्षय्य तृतीया (२६ एप्रिल) या मुहूर्तावर मंदिराच्या कामाला सुरुवात करण्याची घोषणा दिल्लीतील बैठकीनंतर होण्याची दाट चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी (२०२२) अयोध्येतील मंदिर बांधून पूर्ण करण्याचा चंग भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने बांधल्याचे वातावरण आहे. या मंदिराचे पुजारी म्हणून दलित व्यक्तीची निवड करण्यासाठी संघ आग्रही असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात योगी सरकारबाबत तीव्र नाराजी वाढल्याचे ‘फीडबॅक’ दिल्लीत आले आहेत. दुसरीकडे, शाहीनबागेतील महिलांचे सीसीएविरोधी शांततापूर्ण आंदोलन निवडणुकीसाठी घेतलेल्या अल्पविरामानंतर पुन्हा सुरू  होणार आहे.

पंतप्रधानांनी मंदिरासाठी १५ सदस्यीय ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा लोकसभेत नुकतीच केली. यामध्ये राम मंदिर आंदोलनात सक्रिय असलेले रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांचा समावेश न केल्याने ते भलतेच गरम झाल्याचे वृत्त आहे. त्यानुसार ट्रस्टची पहिली बैठक येत्या १९ तारखेला बोलावण्यात आली आहे. यात ट्रस्टचे अध्यक्ष, महामंत्री व खजिनदार यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अयोध्या प्रकरणात दीर्घकाळ हिंदू पक्षकारांची बाजू मांडणारे के. पराशरण या ट्रस्टचे सदस्य आहेत व दुसरे रविशंकर प्रसाद केंद्रात कायदामंत्री आहेत. प्रस्तावित राम मंदिराची भव्य निर्मिती व त्याबाबतच्या साऱ्या विषयांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या ट्रस्टला असेल, असा केंद्राचा दावा आहे.

ट्रस्टचे सध्याचे १५ विश्‍वस्त
ॲड. के. पराशरण, शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ, परमानंद महाराज, स्वामी गोविंददेव गिरी, अयोध्येच्या राजघराण्याचे बिमलेंद्र मोहनप्रताप मिश्र, संघाचे अवध प्रांत कार्यवाह डॉ. अनिलकुमार मिश्र, राम मंदिर आंदोलनातील ‘पहले कारसेवक’ कामेश्वर चौपाल, निर्मोही आखाड्याचे महंत दीनेंद्र दास.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com