
वॉशिंग्टन : ‘‘राष्ट्रहितासाठी काम करणे म्हणजे पक्षविरोधी कारवाया असे कोणाला वाटत असल्यास त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारण्याची गरज आहे,’’ असा टोला काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आज स्वपक्षीयांना लगावला. थरूर यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याची चर्चा होत असली तरी त्यांनी मात्र आज काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.