नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! करा 8 तास काम आणि ओव्हरटाईमसाठी घ्या दुप्पट पैसे

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 December 2020

8 तासांपेक्षा अधिक वेळ काम (working hours) करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे.

Working Hour News Update: 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम (working hours) करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे. सरकारने नवे श्रम कायदे (New Labour Laws)आणल्यानंतर निर्माण झालेली शंका सरकारने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने 2019 मध्ये नवे वेतन बिल मंजुर केले होते. त्यामध्ये कामाची वेळ 8 किंवा 12 तास असेल असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांमध्ये शंका निर्माण झाली होती. 

Economic Times ने दिलेल्या माहितीनुसार, डेली वर्क ऑवर्स 8 तास ठेवण्यावर विचार केला जात आहे. त्यानंतर ओव्हरटाईम सुरु होईल. ओव्हरटाईम करताना वेतन कमीतकमी दुप्पट देण्यात येईल. नव्या श्रम कायद्यांमध्ये 12 तास काम करण्याची तरतूद असल्याची अफवा पसरत होती. याची दखल घेत सरकारने भीती दूर केली आहे. 

फॅक्टरी कायद्यानुसार कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून 9 तासांपेक्षा अधिक वेळ काम करुन घेतात. सध्याच्या व्यवस्थेनुसार जर कामगार आपल्या कामाच्या वेळेपेक्षा 30 मिनिटांपेक्षा अधिक काम करतो, त्याला ओव्हरटाईम मानलं जात नाही. पण, नव्या श्रम नियमांनुसार जर 15 ते 30 मिनिट अधिकचे काम केले तर त्याला ओव्हरटाईम मानला जाईल. त्यामुळे तुम्ही 15 मिनिटापेक्षा अधिकचे काम केल्यास त्याला ओव्हरटाईम मानला जाईल. 

नोव्हेंबर 2020 मध्ये श्रम मंत्रालयाने सादर केलेल्या ड्राफ्टमध्ये कामाची वेळ 12 तास करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या 9 तास कामाचा नियम आहे. दरम्यान, नवे वेतन बिल (Wage Code 2019) ऑगस्ट 2019 मध्ये मंजुर करण्यात आला होता. ज्याला 1 एप्रिल 2021 रोजी लागू होण्याची शक्यता आहे. यात वेतन, बोनस संबंधात 4 प्रकारचे नियम करण्यात आले आहेत. ज्याचे नाव Payment of Wages Act, 1936, Minimum Wages Act, 1948, Payment of Bonus Act, 1965 आणि Equal Remuneration Act, 1976 असे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Working hours to be limited to 8 hours a day overtime pay to be twice that of regular salary

Tags
टॉपिकस
Topic Tags: