World Alzheimer's Day 2022: उपचार नसलेला अल्झायमर विकार; जाणून घ्या लक्षणे

अल्झायमर रोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वृद्धत्व
World Alzheimer's Day
World Alzheimer's Dayesakal

पुणे : आपले शरीर अनेक आजारांचे शिकार होत असते आणि आपल्याला त्याबद्दल माहीतीही नसते. काही आजार गंभीर स्वरूप धारण करतात आणि तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होतो. अल्झायमर ही असाच आजार आहे. या रोगाची सुरुवातीची लक्षणे सामान्य असतात. त्यामुळे अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आज दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक अल्झायमर दिवस' साजरा केला जातो.

हा दिवस अल्झायमर रोगाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. हा रोग सहसा वृद्ध लोकांमध्ये होतो. योग्य वेळी उपचार केल्यास त्याचा वेग कमी करता येतो. आता प्रश्न पडतो की, हा आजार बरा होऊ शकतो का, यावर तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊयात.

अल्झायमर म्हणजे काय?

नवी दिल्लीतील मूलचंद हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. नीरज कुमार यांच्या मते, अल्झायमर हा एक असा रोग आहे ज्यात स्मृती कमी होत जाते, याची लक्षणे पूर्णपणे बरी करता येत नाहीत. हा रोग दिवसेंदिवस वाढतच राहतो.

हा एक प्रकारचा डिम्नेशिया असून त्यामध्ये मेंदूच्या कार्यांमध्ये कायमची हानी होते. या आजारामुळे मेंदू आकुंचित होऊ लागतो आणि मेंदूच्या पेशी खराब होऊ लागतात. हा आजार साधारणतः 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना होतो. पण, मधुमेह, रक्तदाब आणि अनुवांशिक कारणांमुळे हा आजार लहान वयातही होऊ शकतो.

कोणत्या वयाच्या लोकांना धोका

न्यूरोलॉजिस्ट डॉ. नीरज कुमार यांच्या मते, अल्झायमर रोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वृद्धत्व. 90 वर्षांवरील वृद्धांमध्ये या आजाराचा धोका 50 टक्के आणि 80-90 वयोगटातील व्यक्तींना 10 ते 20 टक्के असतो. तरुणांना अल्झायमर होण्याची शक्यता कमी असते, पण तरुणांना हा आजार होत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल.

फोनमुळे अल्झायमर रोगींच्या संख्येत वाढ

मोबाईल फोन, इंटरनेट आणि वाय-फायचे महत्त्व लोकांच्या आयुष्यात खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत फोनचे दुष्परिणामही अधिक वाढले आहेत. नेहमी फोनला चिकटून राहिल्यामुळे, लोकांच्या मेंदूचा वापर कमी करून त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली आहे. मोबाईलमुळे अल्झायमरशी संबंधित बदलांची लक्षणे ही लोकांच्या वयोवर्षे 25 आधीच दिसू लागतात. जर आपला मेंदू दीर्घकाळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या प्रभावाखाली असेल, तर अल्झायमरची समस्या वृद्धापकाळाच्या आधीच येऊ शकते.

हा आजार बरा होतो का?

अल्झायमरचा आजार झपाट्याने वाढत आहे. औषधांद्वारे त्याचा वेग कमी करता येतो, परंतु तो बरा करणे शक्य नाही. हा आजार एकदा मागे लागला की तो आयुष्यभराचा साथी होईल.

अल्झायमर कसा कमी करायचा?

लाइफस्टाइल निरोगी ठेवा,मधुमेह नियंत्रणात ठेवा,रक्तदाब मेंटेन करा ,रोज व्यायाम करा,मानसिकदृष्ट्या ऍक्टीव्ह रहा,सतत लोकांशी संवाद साधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com