esakal | मोठी बातमी! 'कोव्हॅक्सिन'ला या आठवड्यात WHOची मिळणार मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

 icmr, bharat biotech, vaccine, covaxin, human trials

मोठी बातमी! 'कोव्हॅक्सिन'ला या आठवड्यात WHOची मिळणार मंजुरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनला या आठवड्यात मंजूरी मिळणार आहे, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ही ‘कोवॅक्सिन’ लस हैदराबादस्थित निर्माता भारत बायोटेकने तयार केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली तर भारत बायोटेक कोवाक्सिन ही लस निर्यात करू शकेल आणि ज्यांना ही लस मिळाली आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास देखील सुलभ होईल.

याआधी भारत बायोटेक कंपनीकडून सांगण्यात आलं होतं की, त्यांना लवकरच जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळणार आहे, तशी त्यांना आशा आहे. आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्यासाठी कंपनी आणि केंद्र सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहे. यासाठी आवश्यक ती सगळी कागदपत्रे जुलै महिन्यातच कंपनीने दिली आहेत.

WHO ची इमर्जन्सी यूज लिस्टींग (EUL) काय आहे?

WHO ची EUL COVID-19 लशीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासते. त्यासोबतच त्या लशीसंदर्भातील रिस्क मॅनेजमेंट प्लॅन आणि प्रोग्राम संदर्भातील उपुयक्ततेचं आकलन करते. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ईयूएल ही अशी प्रक्रिया आहे ज्यात सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या काळात नवीन आणि लायसन्स नसलेली उत्पादने स्ट्रीमलाईन केली जातात.

loading image
go to top