World Population : लोकसंख्या वाढीत भारत चीनला मागं टाकणार; 2023 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला बनणार देश!

जगात 1950 नंतर प्रथमच लोकसंख्येच्या वाढीचा दर एक टक्क्यानं कमी झाला आहे.
india population
india populationeSakal
Summary

जगात 1950 नंतर प्रथमच लोकसंख्येच्या वाढीचा दर एक टक्क्यानं कमी झाला आहे.

World Population: 2020 पासून जागतिक लोकसंख्येच्या वाढीचा दर एक टक्क्यानं घसरला असला तरी, संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, 2080 मध्ये जगाची लोकसंख्या शिखरावर पोहोचेल आणि 20 वर्षांनंतर म्हणजेच 2100 मध्ये त्याचा कालावधी सुरू होईल. दरम्यान, 2023 मध्ये भारताची लोकसंख्या (India Population) चीनपेक्षा (China) जास्त होईल आणि भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडनं (United Nations Population Fund Report 2022) शुक्रवारी जारी केलेल्या अहवालानुसार, 15 नोव्हेंबरला जगातील आठ अब्जव्या मुलाचा जन्म होईल, त्यामुळं जगाची लोकसंख्या आठ अब्ज होणार आहे. लोकसंख्या वाढीच्या वेगाला ब्रेक लागला असला तरी तो अजूनही वाढत आहे. वास्तविक, जगाची लोकसंख्या 7 ते 8 अब्ज होण्यासाठी 12 वर्षे लागली आहेत. परंतु, 9 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी 15 वर्षे लागतील. 2037 पर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्ज होईल.

india population
मोठी बातमी! उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच येणार एकाच मंचावर; राजकीय समीकरणं बदलणार?

अहवालात म्हटलंय की, जगात 1950 नंतर प्रथमच लोकसंख्येच्या वाढीचा दर एक टक्क्यानं कमी झाला आहे. भारत, चीनसह उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या 61 मोठ्या देशांमध्ये लोकसंख्येच्या वेगाला ब्रेक लागला आहे. या देशांची लोकसंख्याशास्त्रीय रचना अशी बनलीय की, त्यात प्रजननक्षम वयोगटाची लोकसंख्या मोठी आहे. आगामी काळात उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या अधिक तरुणांमुळंच वाढेल. तर, दुसरीकडं 2050 पर्यंत 46 कमी उत्पन्न असलेल्या देशांची लोकसंख्या वेगानं दुप्पट होईल. सध्या जगात प्रति महिला प्रजनन दर 2.3 आहे. 1950 मध्ये हा दर पाच होता. परंतु, लोकसंख्या स्थिर करण्यासाठी हा दर 2.1 पर्यंत खाली आला पाहिजे. हे लक्ष्य 2050 पर्यंतच गाठलं जाईल. त्याचप्रमाणं 2050 मध्ये मुलांपेक्षा दुप्पट वृद्ध लोक असतील. म्हणजेच, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या पाच वर्षांखालील मुलांच्या संख्येच्या दुप्पट असेल.

india population
Pratapgad : अफजल खान मुस्लिम होता म्हणून..; सरकारचं कौतुक करत उदयनराजेंनी दिली स्पष्ट प्रतिक्रिया

2030 मध्ये जगाची लोकसंख्या 8.5 अब्जांपर्यंत पोहोचणार

अहवालात म्हटलंय की, 2022 मध्ये चीनची लोकसंख्या 1.42 अब्ज आणि भारताची 1.41 अब्ज इतकी असेल. 2050 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या 1.68 अब्ज होईल आणि त्यानंतर चीनची लोकसंख्या 1.33 अब्ज होईल. तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अजूनही अमेरिका आहे, ज्याची लोकसंख्या 33.7 दशलक्ष आहे. त्याची लोकसंख्या 2050 मध्ये 37.5 दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. जगाची लोकसंख्या 2030 मध्ये 8.5 अब्ज, 2050 मध्ये 9.7 अब्ज आणि 2100 मध्ये 10.4 अब्ज होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com