#WorldPopulationDay एका सेकंदाला 4 मुलांचा जन्म

population
population

नवी दिल्ली : जगभरात आज (11 जुलै) जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येत असून, वाढती लोकसंख्या ही जगाची डोकेदुखी ठरणार हेही निश्चित झालेले आहे. कुटुंब नियोजन हा मानव अधिकार अशी म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडूनही (यूएन) लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात. 

यंदा यूएनकडून कुटुंब नियोजन मानवाचा अधिकार या थीमवर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आजच्या जगाच्या लोकसंख्येबाबत आश्चर्य वाटेल असे आकडे आहेत आणि यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. वर्ल्डोमीटर्स या संस्थेने केलेल्या जागतिक लोकसंख्येच्या सर्वेक्षणात अनेक आश्चर्य वाटेल असे आकडे समोर आले आहेत. सध्या जगाची एकूण लोकसंख्या 7.6 बिलियन म्हणजे 760 कोटी इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या चीनमध्ये 141 कोटी, त्यानंतर भारतात 135 कोटी आणि अमेरिका तिसऱ्या स्थानावर (32.67 कोटी) आहे. यानिमित्त जाणून घेऊया काही मजेशीर गोष्टी...

  • जगात दर सेकंदाला चार मुलांचा जन्म होतो, तर दोन नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, 2050 पर्यंत लोकसंख्येत प्रचंड वाढ होईल. तर, एकूण लोकसंख्येपैकी 70 टक्के जनतेचे वास्तव्य हे शहरात असणार आहे.
  • भारत, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा आणि इंडोनेशिया या देशातील सध्याची लोकसंख्या ही 2050 पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण, जगातील एकूण लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या या 9 देशांमध्ये राहते.  
  • जगभरात वृद्ध नागरिकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. 2050 पर्यंत वृद्ध नागरिकांची संख्या युवांच्या तुलनेत जास्त असणार आहे. यापूर्वी नेमके याच्या उलट वातावरण होते.
  • जगभरात नायजेरियाच्या लोकसंख्येचे वाढीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. नायजेरिया सध्या सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. 2050 पर्यंत नायजेरिया या यादीत अमेरिकेला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर असेल. 
  • भारताची सध्या लोकसंख्या 135 कोटी असून, भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 2028 मध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल, असा अंदाज यूएनने 2013 मध्ये व्यक्त केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com