देशमुख,मलिक मतदानापासून वंचित,यशवंत सिन्हा भडकले; मोदी सरकारवर साधला निशाणा | Yashwant Sinha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwant Sinha News

देशमुख,मलिक मतदानापासून वंचित,यशवंत सिन्हा भडकले; मोदी सरकारवर साधला निशाणा

दिल्ली : माजी अर्थमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी राज्यसभा निवडणुकीवर ट्विट करुन केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. तुरुंगात असलेल्या आमदारांचे मताधिकार काढून घेणे हे खूप चुकीचे आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाला जिंकण्यासाठी जितके आमदारांची आवश्यकता आहे, तितके अटक करु शकतात, असा हल्लाबोल सिन्हा यांनी मोदी सरकारवर (Government) केला आहे. (Yashwant Sinha Attack On Modi Government Over MLAs Voting Rights)

हेही वाचा: नुपूर शर्माला फाशी द्या; इम्तियाज जलील यांची केंद्राकडे मागणी

पुढे ते म्हणतात, यापूर्वी अशी स्थिती आली नव्हती. मला असे अनेक प्रसंग आठवतात जिथे लोकांनी तुरुंगातून येऊन मतदान केले. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीनाचा अर्ज फेटाळला आहे. मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) मतदान करण्यासाठी न्यायालयात जामीनाचा अर्ज केला होता.

हेही वाचा: जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला मतदान, म्हणाले - आय लव्ह इट

यापूर्वी गुरुवारी (ता.नऊ) विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Web Title: Yashwant Sinha Attack On Modi Government Over Mlas Voting Rights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top