येडियुरप्पा, शिवकुमार संकटात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

काय आहे प्रकरण?
सरकारच्या ताब्यातील ५.११ एकर जमिनीपैकी ४.५ एकर जमिनीचे येडियुरप्पा यांनी २०१० मध्ये डिनोटिफिकेशन केले होते. ही जमीन शिवकुमार यांनी खरेदी केली. शिवकुमार यांना अनुकूल व्हावे, यासाठीच डिनोटिफिकेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बंगळूर - मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी २०१० मध्ये आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राजकीय मित्र डी. के. शिवकुमार यांच्यासाठी जमिनीचे डिनोटिफिकेशन केल्याचा आरोप असून हे प्रकरण आता पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात तुमचा संबंध काय? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सद्यस्थिती काय? या प्रकरणाला का स्थगिती देण्यात आली? उच्च न्यायालयात तुम्ही कोणत्या कारणासाठी सहभागी झाला नाही?, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित करून या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर तुम्ही लोकायुक्तांकडे केव्हा गेलात? लोकायुक्तांनी काय केले? या संपूर्ण माहितीसह नवीन अर्ज दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yeddyurappa and shivkumar in problem