Noida Airport Plots: एअरपोर्टजवळ जमीन घ्यायची आहे ? YEIDAने जाहीर केली स्कीम, चक्क २६५ कोटी किंमतीचे प्लॉट

YEIDA Plot Scheme, Jewar Airport, ₹265 Crore Plot. जेवर विमानतळाच्या पार्श्वभूमीवर YEIDAने ग्रुप हाउसिंग आणि हॉटेलसाठी २० भूखंडांची ई-लिलाव योजना जाहीर केली आहे. सर्वात मोठ्या ५०,६०० चौ.मी. भूखंडाची राखीव किंमत सुमारे ₹२६५ कोटी आहे.
noida jewar airport plot prices

noida jewar airport plot prices

esakal

Updated on: 

नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट (जेवर) कार्यान्वित होण्याच्या पार्श्वभूमीवर यमुना सिटी परिसरातील जमीन आणि व्यावसायिक विकासाला वेग आला आहे. वाढती मागणी आणि आगामी पायाभूत सुविधांचा विचार करून यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (YEIDA) ग्रुप हाउसिंग आणि हॉटेल व्यवसायासाठी दोन स्वतंत्र प्लॉट योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत एकूण २० मोठे भूखंड ई-लिलावाद्वारे देण्यात येणार आहेत.

यामध्ये ग्रुप हाउसिंगसाठी १० आणि हॉटेल उभारणीसाठी १० भूखंडांचा समावेश आहे. निवासी प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या ५०,६०० चौ.मी. भूखंडाची राखीव किंमत सुमारे २६५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com