Yellapur Crime Case
esakal
यल्लापूर (उत्तर कन्नड) : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या रफीकने रंजिता या घटस्फोटीत तरुणीची शनिवारी भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यल्लापूर (Uttara Kannada Crime) येथे घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रफीक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांच्या शोध मोहिमेदरम्यान काळम्मनगर वनक्षेत्रात एका तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला असून तो आरोपी रफीकचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.