
लखनौ : उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्याचे जगभरातून कौतुक करण्यात आले. साधू-संत, महंतांसह कोट्यवधी भाविकांनी या काळात स्नानाची पर्वणी साधली. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे धार्मिक पर्यटनाला चालना देणार आहेत. यासाठी राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची विशेष तरतूद त्यांनी केली आहे.