
लखनौ : एकेकाळी मागास राज्य समजले जाणारे उत्तर प्रदेश आता देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन बनले आहे, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्याची राजधानी लखनौत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेशच्या प्रगतीचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, सुरक्षा आणि सुशासनाच्या धोरणांना दिले.