

Yogi Adityanath and Donald Trump,
sakal
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या आगामी निव़डणुकांकडे पाहता पात्र महिला मतदारांना प्रलोभन म्हणून प्रत्येकी ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली. कोणत्या महिला पात्र हे ही सरकार ठरविणार.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाला मते मिळावी, म्हणून प्रत्येक तरूण मतदाराला ५ हजार डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले. हे आश्वासन त्यांनी अलीकडे डॅलस (टेक्सास) येथे झालेल्या रिपब्लिकन मिडटर्म कन्व्हेन्शनच्या सभेत दिले. तथापि, ‘हे पाच हजार डॉलर्स मतदाराने फक्त अमेरिकेत खर्च केले पाहिजे,’ अशी ट्रम्प यांची अट आहे. ही प्रलोभने म्हणजे मतदारांना निव्वळ लाच आहे. निवडणूक आयोग त्याबाबत मूग गिळून आहे.