

Yogi Adityanath Emphasises Forensic Science and Modern Crime Investigation at Tech Sangam 2026 in Lucknow
esakal
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी न्यायवैद्यक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरत असल्याचे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, “टीव्हीवरील सीआयडीची ‘रील’ लाईफ आता उत्तर प्रदेशमध्ये ‘रिअल’ लाईफ झाली आहे,” असे प्रतिपादन केले. लखनौ येथील उत्तर प्रदेश स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स (UPSIFS) येथे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय ‘टेक संगम २०२६’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.