आदित्यनाथांसारख्या 'केशरचने'वरून वाद

शरद प्रधान - सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 एप्रिल 2017

मेरठ जिल्ह्यातील शाळेचा विद्यार्थ्यांना आदेश; पालक नाराज

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव राज्यात सध्या फारच पडलेला दिसतो. निदान मेरठ जिल्ह्यातील ऋषभ स्कूल या शाळेवर तरी नक्कीच. कारण, विद्यार्थ्यांनी आदित्यनाथांप्रमाणे केशरचना (हेअरकट) ठेवावा, अशी सूचना शाळेने दिली आहे. सोशल मीडियावर हे वृत्त प्रसिद्ध होताच, नाराजीची लाटही आली आहे.

लष्करातील जवान- अधिकाऱ्यांच्या केशरचनेप्रमाणे (सोल्जर कट) योगी आदित्यनाथ यांची केशरचना आहे. म्हणजे ते अगदीच कमी केस डोक्‍यावर ठेवतात. संबंधित शाळेला बहुधा त्यातून स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी "सोल्जर कट'प्रमाणे डोक्‍यावर केस ठेवावेत अशी सूचना फलकावर लावली. फलकावर "सोल्जर कट'ची सूचना असली, तरी योगी आदित्यनाथांप्रमाणेच केस ठेवावेत, अशी स्पष्ट सूचना करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. याचा निषेध म्हणून काही पालकांनी शाळेसमोर निषेध प्रदर्शन केले.

रिशाब स्कूलच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. विद्यार्थ्यांनी लष्करातील नव्या जवानांप्रमाणे अतिशय बारीक केस ठेवावेत, अशी स्पष्ट सूचना फलकावर लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यावर काही विद्यार्थ्यांनी "योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच केशरचना ठेवायची का,' असा प्रश्‍न केल्यावर "हो' असे उत्तर मुख्याध्यपकांनी दिले आणि विद्यार्थ्यांचे लांब केस वाढवणे शाळेच्या शिस्तीत बसत नसल्यामुळे आम्ही हे पाऊल टाकल्याचे स्पष्टीकरण दिले.
यापूर्वी या शाळेत शाकाहार- मांसाहाराचा मुद्दा गाजला होता. विद्यार्थ्यांना डब्यात मांसाहारी पदार्थ आणण्यास बंदी घालण्यात आली होती. शाकाहारी विद्यार्थ्यांना मांसाहारी पदार्थांमुळे अस्वस्थता येत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते.

"शब्दच्छलातून घडला प्रकार'
"आदित्यनाथ हेअरकट'चे वृत्त व्हायरल होताच, राज्य सरकारच्या जनसंपर्क यंत्रणेने चौकशी सुरू केली. शाळेच्या व्यवस्थापनाने कोणावरही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे केशरचना ठेवण्याची सक्ती केली नसल्याची खात्री आम्ही करून घेतली. शब्दच्छलातून हा प्रकार घडल्याचे राज्याचे माहिती सचिव अवनिश अवस्थी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Yogi Adityanath hair style and student