esakal | योगी आदित्यनाथ यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

योगी आदित्यनाथ यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

योगी आदित्यनाथ यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

sakal_logo
By
Vishwas Purohit

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत असून शुक्रवारी सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमधील करोना स्थिती हाताळण्यात योगी सरकारला आलेले अपयश आणि मोदी – योगींमध्ये मतभेदाच्या चर्चा या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मे महिन्यात उत्तर प्रदेशमधील ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. तसेच करोना परिस्थिती हाताळण्यात योगी आदित्यनाथ सरकार अपयशी ठरल्याने जनतेत नाराजी आहे. दुसरीकडे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोदी- योगी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चादेखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. अत्यंत व्यस्त शेड्युलमधून त्यांनी वेळ दिली आणि चर्चा केली याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

हेही वाचा: राज्यांनी मृतांची माहिती दडविल्याचा केंद्राला संशय

या पार्श्वभूमीवर गुरुवारी योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले. गुरुवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुमारे ९० मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर शुक्रवारी सकाळी योगी आदित्यनाथ पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले.

उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्य भाजप पक्ष संघटनेमधील प्रस्तावित बदल, हे योगी यांच्या दिल्लीभेटीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील ठळक विषय आहेत. यादरम्यान, हिंडन विमानतळावर दुपारी अचानक आदित्यनाथ यांचे विमान उतरले. ते उत्तर प्रदेश भवनात गेले आणि तेथून ते अमित शहा यांच्या निवासस्थानी गेले.