UPमध्ये हत्या-दरोड्यांच्या शुटींगचा खर्च वाचेल कारण...; योगींच्या मुंबई दौऱ्यावर 'AAP'ची टीका

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आले होते. जिथे त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली आणि त्यांना यूपीमध्ये चित्रपटांच्या शूटिंगसाठी आमंत्रित केले. यावरून आम आदमी पक्षाने युपींच्या गुन्हेगारीवरून योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका केली आहे. ( yogi adityanath news in Marathi)

Arvind Kejriwal
Meenatai Thackeray : पहिल्यांदाच मांसाहेब शिवसेनेच्या सभेला हजर झाल्या.. कारण होते राज ठाकरे

योगी यांनी उत्तर प्रदेशचे वातावरण आता पूर्णपणे सुरक्षित झाल्याचं सांगत फिल्म सिटीवर लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं. यावर आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांनी योगींच्या चित्रपट विश्वातील लोकांसोबतच्या भेटीवर टीका केली आहे.

योगींनी एक फोटो शेअर केला. त्यात ते म्हणाले, नया उत्तर प्रदेश'मध्ये चित्रपट क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांशी फलदायी चर्चा झाली. त्यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, आपल्या चित्रपट धोरणांतर्गत उत्तर प्रदेश सरकार वेब सीरिजच्या क्षेत्रातही अनुदान देण्याची प्रक्रिया पुढे नेणार असल्याचं म्हटलं.

Arvind Kejriwal
Chitra Wagh : महिला आयोगाची चित्रा वाघ यांनाच नोटीस; चाकणकर म्हणाल्या...

दरम्यान या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आपचे आमदार नरेश बाल्यान यांनी लिहिले की, "मला विश्वास आहे की, यूपीमध्ये चित्रपट बनवणे चित्रपट निर्मात्यांसाठी स्वस्त असेल. कारण इथे तुम्हाला अभिनेत्याची गरज भासणार नाही. इथली सगळी कामं खरी आहेत. जसे दिवसाढवळ्या दरोडा, खून, अपहरण, पोलिसांकडून कोठडीतील खून इत्यादी. दिग्दर्शकाला या सगळ्याचं शूटिंग स्वतंत्रपणे करावं लागणार नाही, असा खोचक टोला बाल्यान यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com