
नवी दिल्ली : ‘‘रस्ते हे वाहतुकीसाठी आहेत प्रार्थनेसाठी नाही,’’ असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज पठण न करण्याबाबत उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या इशाऱ्याचे समर्थन केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीवेळी आदित्यनाथ यांनी याप्रकरणावरून उत्तर प्रदेश प्रशासनाची पाठराखण केली आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्यांवरही आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.