

Swabhiman Yatra Launched Amid Controversy Over Somnath Temple Restoration Claims
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवन कार्यात नेहरूंनी अडथळे निर्माण केले होते, असा गंभीर आरोप त्यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात केला. लखनौमध्ये 'सोमनाथ स्वाभिमान यात्रा' रवाना करताना मुख्यमंत्री योगी बोलत होते. यावेळी त्यांनी भारताच्या फाळणीनंतरच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ देत काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली.