CM Yogi Adityanath
sakal
देश
CM Yogi Adityanath: "हलाल प्रमाणपत्रातून आलेला निधी दहशतवाद, लव्ह जिहादसाठी वापरला जातो" - सीएम योगींचा इशारा
UP Government: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी हलाल-प्रमाणित (Halal-Certified) उत्पादने वापरणाऱ्या ग्राहकांना एक गंभीर इशारा दिला आहे. अशा प्रमाणपत्रातून जमा झालेला निधी दहशतवाद, धार्मिक परिवर्तन आणि लव्ह जिहाद यांसाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी हलाल-प्रमाणित (Halal-Certified) उत्पादने वापरणाऱ्या ग्राहकांना एक गंभीर इशारा दिला आहे. अशा प्रमाणपत्रातून जमा झालेला निधी दहशतवाद, धार्मिक परिवर्तन आणि लव्ह जिहाद यांसाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी सोहळ्याचा भाग असलेल्या 'कुटुंब स्नेह मिलन आणि दीपोत्सव' कार्यक्रमात ते गोरखपूर येथील बाबा गंभीरनाथ सभागृहात बोलत होते.

