

Uttar Pradesh
esakal
देश: उत्तर प्रदेशातील लाखो गरिबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी एका भव्य कार्यक्रमात राज्यातील ९२ हजार लाभार्थ्यांना घरासाठी निधीचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे.
पंतप्रधान आवास योजना-शहरी २.० अंतर्गत हा निधी देण्यात आला असून, लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केवळ पैसेच दिले नाहीत, तर गरिबांना घर बांधताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचनाही दिल्या आहेत.