
लखनौ : पंतप्रधान मोदी यांनी जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर करून काँग्रेससह सर्व विरोधकांनी चकित केले. तसेच कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांसाठी हा निर्णय कोड्यात टाकणारा आहे. ‘बटोगे तो कटोगे’ असा नारा देणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अशी जनगणना अडचणीत आणणारी ठरू शकते. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी त्यांनी आता ‘गोबर (शेण) नीतीचा अवलंब करण्याचे ठरविले आहे.