योगी सरकारच्या मोहिमेला मोठं यश! अवघ्या 6 दिवसात काढले 46000 भोंगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi government in utter Pradesh removed 46000 loudspeakers in 6 days

योगी सरकारच्या मोहिमेला मोठं यश! अवघ्या 6 दिवसात काढले 46000 भोंगे

नवी दिल्ली : यूपीमध्ये पहिल्यांदाच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावणेचे नियम लागू करण्यात आले आहेत. योगी सरकारच्या पुढाकाराने राज्यात सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत धार्मिक स्थळांवरील परवानगीशिवाय लावण्यात आलेले सुमारे 46000 भोंगे हटवण्यात आले असून, 58000 हून अधिक धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्याना स्टँडर्ड ठरवून दिलेल्या आवाजात ते चालवण्याची परवानगी देण्यात आली. शासनाच्या या मोठ्या मोहीमेत प्रत्येक धर्म, जात, वर्ग, समाजातील लोक आपला सहभाग नोंदवत आहेत.

काशी असो वा मथुरा, अयोध्येचे धर्माचार्य असो किंवा रामपूर, मुरादाबाद, बरेली आणि जुने लखनव येथील मौलाना यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या आवाजावर लादलेल्या निर्बंधांचे आणि नवीन नियमांचे खुलेपणाने स्वागत केले आहे. कोणताही वाद आणि निषेध न करता योगी सरकारने धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरबाबत नवे नियम लागू केले आहेत. असे नियम लागू करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. सरकारच्या या निर्णयाला मोठे यश मानले जात आहे. जुन्या लखनवचे मौलाना सरकारच्या या उपक्रमाला सकारात्मक विचार सांगत आहेत, तर यूपीच्या इतर शहरांमध्येही या नव्या नियमाचा परिणाम लोकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

हेही वाचा: 'द्वेशाचं राजकारण' प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण

कोणताही भेदभाव न करता संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. परवानगीशिवाय वाजवले जाणारे असे अनेक लाऊडस्पीकरही काढून टाकण्यात आले आहेत. कोणताही भेदभाव न करता सुरू असलेल्या मोहिमेमुळे राज्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. उल्लेखनीय आहे की सीएम योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की कोणत्याही धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक विधी दरम्यान लाऊडस्पीकर वापरू शकतात, परंतु त्यांचा आवाज परिसराबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. लाऊडस्पीकरच्या आवाजाची कोणालाच अडचण नसावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ला ईडीचा दणका; जप्त केले 5,551 कोटी

Web Title: Yogi Government In Utter Pradesh Removed 46000 Loudspeakers In 6 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top