Yogi government free health scheme for teachers

Yogi government free health scheme for teachers

sakal

Yogi Government : योगी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १५ लाख शिक्षकांसाठी ४४८ कोटींची मोफत आरोग्य कवच योजना

Yogi government free health scheme for teachers : योगी सरकारने उत्तर प्रदेशातील १५ लाख शिक्षक व शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य कवच योजना मंजूर केली. सरकारी व खासगी रुग्णालयांत मोफत उपचार मिळणार असून कुटुंबीयांनाही लाभ मिळेल. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी ४४८ कोटी रुपये खर्च करणार आहे.
Published on

government health scheme : योगी सरकारने उत्तर प्रदेशातील १५ लाख शिक्षक आणि शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उपचारांसाठी पदरमोड करावी लागणार नाही; त्यांना कॅशलेस (मोफत) उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत या महत्त्वाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या वर्षी शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन या निर्णयामुळे पूर्ण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com