Kawad Yatra : ‘सर्वोच्च’ आदेश डावलून कावड यात्रेची तयारी; यंदा परवानाधारकाचे नाव जाहीर करण्याचे आदेश
Supreme Court: कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीला बगल देत अन्नविक्रेत्यांना परवाना व नाव जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून धार्मिक ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लखनौ : उत्तर भारतातील विविध राज्यांत महत्त्वाच्या असलेल्या ‘कावड यात्रे’च्या नियोजनाला सुरुवात झाली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता योगींनी या यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.