रेसिंग विश्वात शोक! १३ वर्षीय भारतीय रेसरचा मुख्य फेरीतील रेसमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू

Racer Harish Shreyas: रेसर हरीषने कमी वयातचं अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या.
Harish Shreyas
Harish Shreyas Esakal
Updated on

13 years Old Racer Died: वयाचं अवघं १३ वर्ष, रेसिंग जगतातील बेताज बादशाह बनण्याचं स्वप्न, वेगावर त्याचं प्रेम होतं. मात्र, ज्या वेगावर त्याचं प्रेम होतं. त्याचं वेगाने त्याचा जीव घेतला. बंगळूरचा प्रतिभावान रेसर श्रेयस हरिष, ज्याचा मद्रास इंटरनॅशनल सर्किटमध्ये एमआरएफ एफएमएससीआय इंडियन मोटारसायकल रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या टप्प्यात झालेल्या दुर्घटनेमुळे शनिवारी (दि.५ ऑगस्ट)त्याता मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेनंतर, आयोजक मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबने शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या सर्व रेस रद्द केल्या आहेत. बंगळूरच्या केनश्री शाळेचा विद्यार्थी असलेल्या श्रेयसचा जन्म २६ जुलै २०१०मध्ये झाला होता. त्याला एक उदयोन्मुख रेसर मानलं जातं होतं, कारण त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या.

त्याने या सत्रातील युवा वर्गाच्या रेसमध्ये सहभाग घेतला होता. त्याने या शर्यतीच्या क्वालिफाईंग राउंडमध्ये पहिले स्थान मिळवले होते. मुख्य शर्यतीच्या पहिल्याच वळणावर त्याच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रेस लगेच थांबवण्यात आली आणि त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं.(Latest Marathi News)

रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यावेळी त्याचे वडीलही सोबत होते. भारतीय मोटरस्पोर्टमधील यावर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी, जानेवारीमध्ये ५९ वर्षाय रेसर केई कुमार याची मद्रास आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये एमआरएफ एफएमएससी इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशीप २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यात त्यातचा अपघात झाला. त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

Harish Shreyas
Irfan Hasan Extortion:माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड इरफान हसन पोलिसांच्या तावडीत, ५० लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com