esakal | बिहार निवडणूक आखाड्यात युवा वारसदार; नेत्यांची पुढील पिढी अजमावणार नशीब
sakal

बोलून बातमी शोधा

bihar

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची किमान २० मुले-मुली आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे.

बिहार निवडणूक आखाड्यात युवा वारसदार; नेत्यांची पुढील पिढी अजमावणार नशीब

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहारच्या राजकारणात राजकीय घराणेशाहीचा मुद्दा येतो, तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांचे नाव पुढे येते. याचप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची किमान २० मुले-मुली आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे.

CBI च्या माजी अधिकाऱ्याला 25 लाखांच्या लाच प्रकरणी अटक; महिन्याभरापूर्वी झालाय...

तेजस्वी व तेजप्रताप यादव

लालू प्रसाद यादव व राबडी देवी यांचा वारसा पुढे नेण्याची व ‘आरजेडी’ची धुरा या दोन पुत्रांवर आहे. लालूंचे ज्येष्ठ पुत्र व माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हे २०१५च्या निवडणुकीत वैशाली जिल्ह्यातील महुआ मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदा मात्र यादवांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघाच्या शोधात ते आहेत. हसनपूर मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ १९६७ पासून यादवांच्या ताब्यात आहे. २०१५ च्या निवडणुकीत येथून ‘आरजेडी’ व ‘जेडीयू’चे संयुक्त उमेदवार व तेजप्रताप यांचे सासरे राजकुमार राय विजयी झाले होते. यंदा येथून तेजप्रताप यांच्याविरोधात ‘जेडीयू’कडून त्यांची पत्नी ऐश्‍वर्या यांना रिंगणात उतरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सर्वांत चर्चेतील चेहरा

बिहारच्या राजकारणात पुष्पम प्रिया चौधरी या युवा चेहऱ्याची जोरदार चर्चा आहे. देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात त्यांनी पूर्ण पान जाहिराती देऊन स्वतःचा उल्लेख बिहारच्या भावी मुख्यमंत्री असा केला होता. यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचे वडील विनोद चौधरी हे ‘जेडीयू’चे नेते व विधान परिषदेचे आमदार होते. राजकीय वारसा असला तरी त्यांच्याकडे राजकारणाचा अनुभव मात्र नाही. यावेळच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्लूरल्स पक्ष स्थापन करून सर्व जागा लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून त्या स्वतः बांकीपूरसह अजून एका मतदारसंघातून लढणार आहेत.

कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी

निवडणूक लढण्याच्या तयारीत युवा पिढी (वडिलांचे नाव)
१) आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह (माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह)
२) चेतन आनंद (माजी खासदार आनंद मोहन)
३) अजय सिंह आणि सुमित सिंह (माजी मंत्री नरेंद्र सिंह)
४) शहबाज आलम (दिवंगत माजी खासदार तस्लीमुद्दीन)
५) शाश्वत चौबे (केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे)
६) ऋषि यादव ( माजी केंद्रीय मंत्री कांति सिंह)
७) कन्हैया प्रसाद (राधाचरण सेठ)
८) शुभानंदसिंह (विधानसभेचे माजी अध्यक्ष सदानंदसिंह)
९) शिवप्रकाश गरीबदास (रामदेव राय)
१०) जय कुमार वर्मा (माजी मंत्री उपेंद्र प्रसाद वर्मा)
११) माधव झा (काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा)
१२) अभिमन्यू यादव (माजी केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव)
१३) संजीव चौरसिया (सिक्किमचे राज्यपाल गंगा प्रसाद)