नवविवाहितेचा चिरला गळा! दुसऱ्याबरोबर लग्न झाल्यानं प्रियकराचं टोकाचं पाऊल : Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime News

Crime News : नवविवाहितेचा चिरला गळा! दुसऱ्याबरोबर लग्न झाल्यानं प्रियकराचं टोकाचं पाऊल

नवी दिल्ली : नव्या नवरीचा गळा धारदार शस्त्रानं चिरुन तिला गंभीर जखमी करण्यात आल्याचा भयानक प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथं घडला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली अूसन हल्लेखोर तरुण हे कृत्य करुन पळून गेला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Young Man Slit His Girlfriend Throat In Marriage Ceremony in Uttar Pradesh)

पोलिसांच्या माहितीनुसार, नवरीचा गळा चिरणारा तिचा आधीचा प्रियकर असून प्रेयसीचं लग्न झाल्याचं सहन न झाल्यानं विवेक गमावलेल्या या तरुणानं लग्न समारंभात शेकडो पाहुण्यांच्यासमोर तिच्या गळ्यावर ब्लेडनं वार केले. "तू माझी झाली नाहीस तर मी तुला दुसऱ्याचीही होऊ देणार नाही," असा फिल्मी डॉयलॉगही त्यानं यावेळी मारला. गळ्यावर वार झाल्यानं संबंधित तरुणीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. मुरादाबादच्या कुंदरकी नगरमधील नुरुल्ला भागात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीचे वडील शकील अहमद यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी तक्रार देताना सांगितलं की, "रविवारी, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न पार पडलं. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा ही नवविवाहिता आपल्या बहिणींसोबत त्यांच्याच घराजवळील एका लग्नसमारंभात जेवणासाठी गेली. याचवेळी त्यांच्या घराजवळच राहणारा यासीन देखील या समारंभात घुसला आणि त्यानं तिच्या गळ्यावर ब्लेडनं वार केले यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

गळ्यावर गंभीर घाव, खाणंपिणं झालं बंद

नवविवाहितेच्या गळा ब्लेडनं कापला गेल्यानं ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण सध्या तिला डॉक्टरांनी काहीही खाण्यापिण्यापासून मज्जाव केला आहे.

टॅग्स :Crime NewsDesh news