New Delhi : युवकांनी राजकीय बदल यशस्वी करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांनी राजकीय बदल यशस्वी करावा

युवकांनी राजकीय बदल यशस्वी करावा

लखनौ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी ८२व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही चालना दिली. देशात राजकीय बदल होत असून युवकांनी ते यशस्वी करावेत, असे सूचक आवाहन त्यांनी केले.

मुलायम पक्षाच्या विक्रमादित्य मार्ग येथील मुख्यालयात पुत्र तसेच पक्षाध्यक्ष अखिलेश यांच्यासह दाखल झाले. राज्यभरातील कार्यकर्ते या मेळाव्यासाठी आले होते. मुलायम यांनी ८३व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल तेवढ्या वजनाचा केक कापण्यात आला.

उत्साही युवकांनी हा बदल घडवून आणावा, असे आवाहन करून ते म्हणाले की, ‘आज तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात, पण गरिबातल्या गरीब व्यक्तीचा तसेच तुम्हा सर्वांचाही वाढदिवस साजरा केलात तर मला आनंद होईल. तुम्ही त्यासाठी मला आमंत्रण द्या. मी जरूर येईन.’ मुलायम यांनी सर्व कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यावेत, असे अखिलेश यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मोदी यांच्या शुभेच्छा

मुलायम यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

शिवपाल अनुपस्थित, पण...

मुलायम यांचे लहान भाऊ तसेच प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (लोहिया) प्रमुख शिवपाल या कार्यक्रमास अनुपस्थित होते, मात्र त्यांनी मुलायम यांच्या सैफई या जन्मगावी दरवर्षीप्रमाणे कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून ते तेथे आहेत असे एका नेत्याने सांगितले.

loading image
go to top