esakal | न्यूझीलंड दूतावासानं काँग्रेसकडं मागितला ऑक्सिजन; केंद्र सरकार ट्रोल

बोलून बातमी शोधा

New Zealand High Commission

रविवारी सकाळी न्यूझीलंड दूतावासने युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर्ससाठी मदत मागितली.

न्यूझीलंड दूतावासानं काँग्रेसकडं मागितला ऑक्सिजन; केंद्र सरकार ट्रोल
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड दूतावासाने ऑक्सिजन सिलिंडरसाठी युवा काँग्रेस नेत्याकडे मदत मागितली. यासंबंधीचं ट्विटही त्यांनी केलं होतं. पण काही वेळानंतर दूतावासाने ते ट्विट डिलिट केलं. त्यामुळे सोशल मीडियात चर्चेचा सुरवात झाली आहे.

रविवारी सकाळी न्यूझीलंड दूतावासने युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडरसाठी मदत मागितली. त्यांनी काँग्रेसच्या एसओएस ट्विटर अकाउंटलाही टॅग करण्यात आले होते. दूतावासने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, तुम्ही न्यूझीलंड दूतावासला ऑक्सिजन सिलिंडरची मदत पोहोचवू शकता का? धन्यवाद.

त्यानंतर सोशल मीडियात केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली. परदेशी दूतावासांनाही विरोधी पक्षांकडे मदत मागावी लागत आहे. केंद्र सरकार काय करत आहे? ट्विटरवर वाद-विवाद सुरू होताच न्यूझीलंड दूतावासाने ट्विट डिलिट केले. 'आम्ही ऑक्सिजन सिलिंडरसाठी सर्वांकडे मदत मागत आहे. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो,' अशा आशयाचे ट्विट केले आहे.

न्यूझीलंड दूतावासाने मदत मागितल्यानंतर युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी ऑक्सिजन सिलिंडरची मदत पोहोचवली. या आधी शनिवारी काँग्रेसने फिलिपाईन्स दूतावासलाही ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली होती. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू झाली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांना ट्विटद्वारे प्रश्न विचारला आहे. एक भारतीय नागरिक या नात्याने काँग्रेसने केलेल्या मदतीबद्दल मी त्याना धन्यवाद देतो. विदेशी दूतावासांना एका विरोधी पक्षाकडे मदत मागावी लागत आहे. परराष्ट्र मंत्रालय काय झोपलं आहे का? असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला आहे.