पॉर्न व्हिडिओ पाहून नक्कल करण्याचा प्रयत्न अन् गमाविला जीव

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पोलिसांना या घटनेची माहिती ही मृतकाच्या रुममधील पार्टनरकडून मिळाली होती. मृत व्यक्तीचा रुम पार्टनर हा जेव्हा आपल्या रुममध्ये आला तेव्हा त्याला समजंल की, आपल्या घराची कडी ही आतून लावण्यात आली होती. त्यामुळे त्याने पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिली.

पाटणा : बिहारमधील पाटलीपुत्र येथील एक घटना वाचून तुम्हाला धक्का बसेल, कारण एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी अचानक त्याची मान दबली गेली आणि जीव गेला. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती ही मृतकाच्या रुममधील पार्टनरकडून मिळाली होती. मृत व्यक्तीचा रुम पार्टनर हा जेव्हा आपल्या रुममध्ये आला तेव्हा त्याला समजंल की, आपल्या घराची कडी ही आतून लावण्यात आली होती. त्यामुळे त्याने पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिली.

पोलिसां दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती एका मेडिकल कंपनीमध्ये काम करत होती. ही व्यक्ती अश्लील व्हिडिओ पाहून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी अचानक त्याची मान दबली गेली. या मृत्यूचे कारण पोलिसांना घटनास्थळी मृताच्या मोबाइलमधूनच मिळालं. कारण मृतदेहाशेजारीच त्याचा मोबाइल सापडला होता. 

पोलिसांनी जेव्हा हा फोन पाहिला त्यावेळी त्यात अश्लील व्हिडिओ सुरु असताना दिसले. मृत तरुणाचा मृतदेह हा पोलिसांना व्हिडिओमध्ये मुलगी ज्या स्थिती दिसत होती तशाच अवस्थेत आढळून आला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ सापडले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth death when he watching porn video in and doing same thing