प्रेयसीसोबत होळी खेळण्यासाठी घुसला तिच्या घरात अन्...

वृत्तसंस्था
Wednesday, 11 March 2020

प्रेयसीसोबत होळी खेळायची म्हणून प्रियकराने तिच्या घरात प्रवेश केला. युवतीच्या वडिलांनी त्याला पाहिल्यानंतर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पिलीभीत (उत्तर प्रदेश): प्रेयसीसोबत होळी खेळायची म्हणून प्रियकराने तिच्या घरात प्रवेश केला. युवतीच्या वडिलांनी त्याला पाहिल्यानंतर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रेयसीला बोलावले घरी अन् केले 'हे' कृत्य....

अंकित दीक्षित असे प्रियकराचे नाव आहे. साहूकार परिसरात तो राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित प्रेयसीसोबत होळी खेळण्यासाठी तिच्या घरी गेला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर युवतीच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि घराबाहेर काढले. दारूच्या नशेत असलेल्या अंकितने स्वतःवर गोळी झाडून घेतली. जखमी झालेल्या अंकितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रेयसीने ते पाहिले अन् म्हणाली आपलं लग्न झालेच नाही...

युवतीच्या वडिलांनी सांगितले की, अंकितने दारूच्या नशेत असताना घरामध्ये प्रवेश केला. त्याला घराबाहेर जा म्हटल्यानंतर त्याने गोळी झाडून घेतली. याबाबतची माहिती आम्ही पोलिसांना दिली.

नवरदेव मंगळसूत्र घालणार तेवढ्यात नवरी म्हणाली थांब...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth failed to play holi with girlfriend shot himself