प्रियकर म्हणाला, शेवटचा कॉल उचल बघ काय करतोय

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

मी, तुला व्हिडिओ कॉल करतो. तू घे. बघ मी काय करतो ते, असे प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला. पण, प्रेयसीने त्याचा व्हिडिओ कॉल घेतलाच नाही.

सहरसा (बिहार): मी, तुला व्हिडिओ कॉल करतो. तू घे. बघ मी काय करतो ते, असे प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला. प्रेयसीने त्याचा व्हिडिओ कॉल घेतला नाही. दुसरीकडे त्याने व्हिडिओ कॉलिंग सुरू करून गळफास घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत मिश्र (वय 27) हा काकांच्या घरी राहून शिक्षण घेत होता. शनिवारी (ता. 7) रात्री अभ्यास करण्यासाठी तो त्याच्या खोलीमध्ये गेला होता. मुंबईमध्ये राहणारी त्याची बहिण त्याला सतत फोन करत होती. परंतु, तो फोन घेत नव्हता. त्यामुळे तिने काकांना फोन केला. काकांना त्याच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. खिडकीमधून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. काकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

गळफास घेतला त्यावेळी कानामध्ये हेडफोड होते. शिवाय, व्हिडिओ कॉलिंग केल्याचेही आढळून आले. व्हिडिओ कॉलिंग केलेल्या क्रमाकांवर संपर्क साधल्यानंतर तो क्रमांक त्याच्या प्रेयसीचा असल्याचे समजले. प्रेयसीने सांगितले की, 'नवनीत हा व्हिडिओ कॉलिंग करून आत्महत्या करणार असल्याचे बोलत होता. फोन करून माझा शेवटचा कॉल उचल बघ काय करतोय... असे म्हणत होता. त्यामुळे त्याचा फोन उचलला नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth video call her girlfriend and suicide at bihar