
चंडीगड : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली प्रसिद्ध यूट्यूबर आणि इन्फ्लूएन्सर ज्योती मल्होत्रा हिची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे. ज्योतीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांशी देखील संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ज्योतीला परदेशातून मिळालेले पैसे आणि त्याच्या प्रवासाचा तपशील याचा शोध घेतला जात आहे.