

uttarakhand jungle yudh 2026
esakal
उत्तराखंडमधील औलीच्या पर्वतरांगांमध्ये भारत आणि अमेरिकेच्या जवानांचा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. भारत-अमेरिकेच्या सैन्याच्या संयुक्त ‘युद्ध अभ्यास २०२६’ या सरावाची २२वी आवृत्ती १५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, सुमारे दोन आठवडे हा सराव चालणार आहे. दोन्ही देशांचे प्रत्येकी सुमारे ६०० जवान यात सहभागी झाले आहेत. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज अशा दोन वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत सराव एकाच वेळी होत आहे.